शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

बाळाने खेळताना गिळले नेलकटर, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 2:58 PM

नाशिकमधील घटना : सुदैवाने वाचले प्राण, शस्त्रक्रिया यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क   नाशिक : येथील नाशिकरोड भागातील एका कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाने घरात खेळताना हाती लागलेले नेलकटर चक्क गिळले. बाळाला त्रास होऊ लागल्याची  बाब वेळीच आईच्या लक्षात आल्याने तातडीने बाळाला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. तेथे तपासणी केल्यानंतर तेथून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी यशस्वीपणे नेलकटर बाहेर काढले.  

बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी मंगळवारी सांगितले. कुटुंबातील सदस्यांच्या विनंतीमुळे बाळाचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात नाशिक रोडचे हे कुटुंब बाळाला घेऊन सर्वप्रथम आले होते. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्गाने तपासणी केली असता शस्त्रक्रिया अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तेथून मुलाला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय कुटुंबातील प्रमुखांनी घेतला. तेथे रात्री यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून बाळाच्या घशात अडकलेले नेलकटर काढण्यात डॉक्टरांना यश आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी अशा गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक