गेल्या अनेक महिन्यांपासून बडदेनगर ते पाटीलनगर या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे सिडकोसह परिसरातील कामगार व नागरिकांना या रस्त्याने वाहतूक करता येत नाही. बडदेनगर ते पाटीलनगर हा १८ मीटर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा काढली होती. त्यानुसार हा रस्ता डांबरी करण्यासाठी वर्षभराचा कालावधी दिला होता. यासाठी सुमारे सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली आहे. सध्या या रस्त्याचे बडदेनगरपासून सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ २५ ते ३० टक्के इतकेच काम शिल्लक आहे परंतु जमीन भूसंपादनबाबतचा वाद उफाळून आला.
कोट..
बडडेनगर ते पाटीलनगर हा रस्ता सुरू झाल्यामुळे सर्व नवीन नाशिक परिसरातील नागरिकांची सोय झाली व वेळही वाचतो आहे, परंतु आता पावसाळा सुरू झाल्याने काही ठिकाणी काम बाकी असल्याने तिथे चिखल होऊन आता रस्ता बंद होत आहे. महापालिकेने रस्त्याचे काम पूर्ण करावे हीच अपेक्षा.
-प्रसाद सुरेश जाधव
---------------------
कोट..
महापालिकेच्या वतीने बडदेनगर ते पाटीलनगर या रस्त्याचे डांबरीकरण याचे काम हाती घेतले खरे परंतु अर्धवट रस्ता झाल्याने या रस्त्याने ये-जा करणे कठीण होत आहे. पावसामुळे अर्धवट झालेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, मनपाने याबाबत दखल घेत या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे.
-चित्रा प्रशांत देवरे, सिडको
(फोटो ०८ सिडको)