शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा

By admin | Published: June 24, 2014 8:27 PM

८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा

 ८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाला कसा प्रतिसाद आहे?गेल्या दोन वर्षांपासून बॅडमिंटन खेळाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी बॅडमिंटन सुविधादेखील कमी होत्या. सरावासाठी कोट कमी होते; मात्र शहरात विविध ठिकाणी सध्या एकूण वीस वुडन कोटमध्ये खेळाडू सराव करतात. नाशिकमध्ये १५० विद्यार्थी खेळाडू प्रशिक्षण घेत असून, दहा वर्ष वयोगटापासून तर थेट प्रौढ वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. क्रिकेट खेळानंतर बॅडमिंटन हा खेळप्रकाराचा क्रमांक लागतो. शहराबरोबरच जिल्ह्यात व विभागातदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांना संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते.  बॅडमिंटन खेळाच्या प्रगतीसाठी कोणते उपक्रम राबविले जातात?दरवर्षी संघटनेच्या वतीने दोन जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. यामधून चांगल्या प्रकारच्या युवा खेळाडूंसह शालेय विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना राज्यस्तरावरदेखील विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. वर्षभरातून दोन प्रशिक्षण कॅम्पचे आयोजन केले जाते. यामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन करतात. राज्यस्तरावर पाठविल्या जाणाऱ्या खेळाडूंचा खर्च संघटनेकडून केला जातो. यंदा नाशिकची १५ वर्ष वयोगटातून वैदेही चौधरी ही खेळाडू राज्यस्तरावर निवडली गेली असून, ती इंडोनेशिया येथे विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी गेली आहे. यावर्षी होणाऱ्या स्पर्धेचे वैशिष्ट्य कोणते? गेल्या पाच वर्षांमध्ये तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा शहरात आयोजित केली जात आहे. दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या संघटना बळकट होत आहे. आज (दि. २५) मीनाताई ठाकरे स्टेडियम आडगाव नाका येथे पाच दिवसीय स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातून ८५० प्रवेशिका आल्या आहेत हेच या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तिन्ही गटांमध्ये सेमी फायनल, क्वार्टर फायनल, फायनलमध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.  स्पर्धेमध्ये कोणत्या नामांकित खेळाडूंनी सहभाग आहे? संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन विविध वयोगटामध्ये स्पर्धा आयोजित करते. यामध्ये सब ज्युनिअर, ज्युनिअर अ‍ॅन्ड सिनियर या तीन गटांत स्पर्धा खेळविली जाते. नाशिकमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुंबईची सिमरन संधी, पूर्वा बर्वे, वरुण दवे, रोहन गुरनानी, तनिष्का देशपांडे, अमन फारूख आदिंचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याचे एकूण दोनशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रदीप गंधे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.