सटाणा : बागलाण तालुक्यातील दोन रुग्ण शनिवारी कोरोनाबाधित आढळल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांंपैकी तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका कुटुंबातील माय-लेकाचा तर दुसऱ्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यातील दहा बाधित रुग्ण जायखेड्याचे असल्याने परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.जायखेडा येथील मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तब्बल दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, सटाणा शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. जायखेडा गावामध्ये एकाच वेळी दहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने मोसम खोºयासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती संकलित केली जात आहे. त्या सर्वांना क्वॉरण्टाइन करून त्यांचे अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
बागलाणमध्ये एकाच दिवशी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:49 PM
बागलाण तालुक्यातील दोन रुग्ण शनिवारी कोरोनाबाधित आढळल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांंपैकी तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका कुटुंबातील माय-लेकाचा तर दुसऱ्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यातील दहा बाधित रुग्ण जायखेड्याचे असल्याने परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देधोक्याची घंटा : जायखेड्यात आढळले दहा रुग्ण; गाव सील