औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत जीर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत व शाळेने जिल्हा परिषदेला व पंचायत समितीला तीन वर्षांपूर्वी ठराव देऊनही अद्याप प्रशासनाने दखल घेतलेली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. सदर जीर्ण इमारत त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी सरपंच सविता निकम यांनी केली आहे.विंचूर - प्रकाशा महामार्गावरील गाव असून, रस्त्यालगत ही जिल्हा परिषदेची जुनी इमारत आहे. रस्त्यावरून ये जा करणाºयांचे ही धोकादायक पडकी इमारत लक्ष वेधून घेत आहे. गावातील चौथीपर्यंत विद्यार्थ्यांची ही शाळा आहे या शाळेत ९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही जुनी ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत नवीन इमारत बांधण्यात पाठीमागे बांधण्यात आली आहे. परंतु पुढील बाजूला जुनी इमारतीच्या ३ वर्गखोल्या धोकेदायक आहेत. इमारतीवरील कौले फुटली इमारतीवरील कौले फुटली आहेत, भिंती अर्धवट पडल्या आहेत. इमारत निरलेखन करावी याबाबत ग्रामपंचायतीने व शाळेने जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव दिला आहे व वेळोवेळी पाठपुरावा करून ही तरी अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासनाने लवकर दखल घ्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनीही केली आहे.
बागलाण : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम करण्याची मागणी औंदाण्याची शाळा धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:44 PM
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत जीर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देइमारत त्वरित दुरुस्त करावी३ वर्गखोल्या धोकेदायक