बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पीके नष्ट झाली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकावे लागत आहे. शासनाने बागलाण तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा. तसेच आघार येथील दंगलीतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे. बागलाण तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुका अध्यक्ष बापुराज खरे व तालुका महिला आघाडी प्रमुख अरु णा बच्छाव यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रदीप सोनवणे, बापूसाहेब पवार, रमेश व्यापार, मुकुंद भामरे, शरद भामरे, सुरेश आणारे, जिभाऊ अहिरे, सुनील भामरे, यशवंत अहिरे, सुनील माळी, संजय बच्छाव, निलेश खरे, शरद जगताप, मुकुंद भामरे, गुलाब खरे, मयूर जगताप, रवींद्र पवार, भाऊसाहेब उशीर, ताराचंद उशीर, मोहन साळवे, अशोक खरे, दत्तात्रेय खरे आदी उपस्थित होते.
बागलाण तालुका दुष्काळी जाहिर करण्याचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 5:42 PM