लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशी डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदाही बहरली आहे. या वर्षीही जून आरंभापासूनच चांगला पाऊस होत असल्याने नैसिर्गकरीत्या लाभलेले जंगल या वर्षीही हिरवेगार झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा डोंगर रांगासह सुमारे बाराशे हेक्टर क्षेत्रातील विस्तीर्ण वनराई पसरलेली आहे.या जंगलात विविध वनौषधी आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर अवर्षण ग्रस्त झालेला होता त्यामुळे जंगलाचे संगोपन आण िसंवर्धन फारशा प्रमाणात झालेले नव्हते कारण पाण्याअभवी येथील असंख्य झाडे झुडपे वाळत चालली होती.वनविभागाने परिश्रम घेऊनही जंगलाचा चेहरामोहरा फारसा बदलत नव्हता. परंतु मागील वर्षीही चांगला पावसाळा होता आण ियाही वर्षी जून आरंभापासूनच चांगला पाऊस होत असल्याने जंगल हिरव्या शालूने नटलयासारखे दिसू लागले आहे. जर दरवर्षी असाच पावसाळा राहिल्यास ही वनराई पर्यटन स्थळ सारखी देखील होऊ शकते. कारण आजही या जंगलात विविध वनौषधीबरोबरच अनेक प्रकारचे जंगली जनावरे देखील नजरेस पडली आहेत. वनराईच्या एका बाजूला मोठया डोंगररांगा पसरलेल्या असल्या मुळे जनावरे निश्चित असणार. मेशी, डोंगरगाव, खारीपाडा येथील वनकमिटी बरोबरच वनविभागानेही जंगल संवर्धनाबाबत नेहमीच जागरूकता दाखिवली आहे. त्यामुळेच वनराई खूपच नैसिर्गक देणगी असल्यासारखीच वाटतं आहे. आता खरी गरज आहे ती म्हणजे असेच पावसाची कृपा असणे आवश्यक आहे. या रस्त्याने फारशी वाहनांची वर्दळ नसते म्हणूनच वनराई सौंदर्याची उधळणाची नासाडी होत नाही. (फोटो ३० मेशी, १)
मेशी-डोंगरगाव रस्त्यालगत बहरली वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 3:42 PM
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशी डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदाही बहरली आहे. या वर्षीही जून आरंभापासूनच चांगला पाऊस होत असल्याने नैसिर्गकरीत्या लाभलेले जंगल या वर्षीही हिरवेगार झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा डोंगर रांगासह सुमारे बाराशे हेक्टर क्षेत्रातील विस्तीर्ण वनराई पसरलेली आहे.
ठळक मुद्दे पाण्याअभवी येथील असंख्य झाडे झुडपे वाळत चालली होती.