शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

बैलजोडी चक्क तीन हजारांना...

By admin | Published: August 27, 2016 11:48 PM

उत्सव बळीराजाचा : पीओपीच्या बैलांची भुरळ; सजावटीच्या साहित्यांची थाटली दुकाने

नाशिक : बळीराजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेला पोळ्याचा सण येत्या गुरुवारी (दि.२७) साजरा होणार आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठेत लगबग पहावयास मिळत आहे. मातीच्या बैलांबरोबरच पीओपीच्या बैलांचीही भुरळ नागरिकांना पडत आहे. पीओपीच्या आकर्षक मोठी बैलजोडीची किंमत सुमारे साडेतीन हजारांपर्यंत आहे.वर्षभर काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या मुक्या सर्जा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस जवळ येत असून महाराष्ट्राचा उत्सव बैलपोळा साजरा करण्यासाठी शेतकरी वर्ग सज्ज झाला आहे. शहरात गणेश चतुर्थीबरोबरच पोळ्याचीही लगबग दिसत आहे. बैलजोडी सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्य विक्रीची दुकाने रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, निमाणी परिसरात थाटण्यात आली आहे. एकूणच यंदा पोळा, गणेशोत्सव हे दोन्ही सण एकापाठोपाठ साजरे होत असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे.ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे ते पोळ्याच्या मुहूर्तावर आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ मानून बैलजोडीची पूजा करतात. यावेळी सुवासिनींकडून बैलांची पूजा करत एकप्रकारे जणू आशीर्वादच घेतला जातो. पोळ्याचा उत्सव महाराष्ट्रात गणेशोत्सवाप्रमाणेच उत्साहात साजरा केला जातो. शहरी भागात पोळ्याचा उत्साह कमी जरी जाणवत असला तरी शहराला लागून असलेल्या खेड्यांमध्ये पोळा जणू दिवाळीप्रमाणेच साजरा होतो. तीन दिवसांवर पोळ्याचा सण येऊन ठेपल्याने बाजारपेठेत बैलांच्या शिंगांपासून तर पायांच्या खुरापर्यंत सजावट करण्याचे विविध साहित्य, रंग उपलब्ध झाले आहेत. नागरिक घराघरांमध्ये मातीची बैलजोडी खरेदी करून पूजा केली जाते. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मातीचे बैल विक्रीस आले आहेत. याबरोबरच पीओपीपासून तयार केलेल्या बैलांचेही नागरिकांना आकर्षण असून काळानुरूप मातीच्या बैलांचेही रूप बदलत आहे. आकर्षक रंगसंगतीचा वापर करत मातीपासून तयार करण्यात आलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर्षी मातीच्या बैलांसह पीओपीच्या बैलांनाही मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जुना गंगापूर नाका येथील एका मातीच्या वस्तू विक्रीच्या दुकानात पीओपीपासून तयार केलेल्या बैलजोडीची किंमत आकारानुसार आहे. (प्रतिनिधी)