सभापती सुदाम बिरारी व उपसभापती भालचंद्र चव्हाण यांनी आवर्तन पध्दतीनुसार पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी बागलाण सहाय्यक निबंधक महेश भंडागे यांनी निबंधक कार्यालयात सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी सभापतीपदासाठी गिरीधर बिरारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्याला सुचक म्हणून सदस्य कारभारी बिरारी होते तर अनुमोदक म्हणून सदस्य भालचंद्र बच्छाव होते. उपसभापतीपदासाठी कैलास बिरारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला.प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक महेश भंडागे यांनी काम पाहिले. यावेळी बाजार समिती संचालक व सोसायटीचे संचालक संजय बिरारी, माजी जिल्हा परिषद सदस्य व सोसायटीचे संचालक अनिल पाटील, कारभारी बिरारी, सुदाम बिरारी, भालचंद्र चव्हाण, पंकज गायकवाड, भालचंद्र बच्छाव, अण्णा माळी, सचिव अनिल बत्तीसे उपस्थित होते.
कंधाणे सोसायटीच्या सभापतीपदी बिरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 7:01 PM