देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत गायीचा पंचनामा केला असून लवकरच संबंधित शेतकºयाला नुकसानभरपाई दिली जाईल अशी माहीती वन परीक्षेत्र अधिकारी ए. एन. शेख यांनी दिली आहे.े कोलते शिवारातील शेतकरी दत्तात्रेय गमाजी शिंदे यांच्या राहत्या घराशेजारील गोठ्यात असलेल्या गायीवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकून शिंदे घरातुन बाहेर आले व घराच्या पाठीमागे बांधलेल्या गायींकडे गेले असता एक गाय त्यांना दिसली नाही.त्यांनी आजूबाजूच्या परीसरात शोध घेतला परंतु गाय सापडली नाही. शिंदे यांनी पोलिस पाटील निशा देवरे यांना घडलेली घटना कथन केली. देवरे यांनी देवळा वन विभागाला घटनेची माहिती दिली.परीसरातील शेतकरी जमा झाले व बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी गायीचा शोध सुरू केला. जवळच असलेल्या डोंगराकडे बॅटरी प्रकाशात त्यांना बिबट्या दिसला, परंतु शेतकºयांनी डोंगरावर जाण्याची हिंमत केली नाही. सकाळी डोंगरावर जाऊन शोध घेतला असता गाय मृत अवस्थेत सापडली.
वाजगाव येथे बिबट्याने गाय केली फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 5:48 PM
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत गायीचा पंचनामा केला असून लवकरच संबंधित शेतकºयाला नुकसानभरपाई दिली जाईल अशी माहीती वन परीक्षेत्र अधिकारी ए. एन. शेख यांनी दिली आहे.
ठळक मुद्दे देवरे यांनी देवळा वन विभागाला घटनेची माहिती दिली.