नाशिक : गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा... अशा मंगलाष्टकांच्या गजरात आणि व्यंकट रमणा गोविंदा असा जयघोष करत गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिरात भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा गुरुवारी (दि. २८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून गुरुवारी (दि. २१) ब्रह्मोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून, दररोज येथील बालाजी मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवांतर्गत गुरुवारी (दि. २८) गोरज मुहूर्तावर देवी पद्मावतीशी भगवान बालाजी यांचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २४) लवाटेनगर येथील महालक्ष्मी मंदिरात देवीला महावस्त्र अर्पण करून लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी आनंद जोशी, प्रमोद भार्गवे, राजाराम मोगल, आशिष कुलकर्णी, महेश हिरे, अशोक खोडके आणि अवधूत देशपांडे आदी विश्वस्तांसह शहरातील विविध भागांतून आलेल्या वºहाडी भाविकांची यावेळी सोहळ्यासाठी गर्दी झाली होती.
बालाजी विवाह सोहळा थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:52 AM