सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे बाळासाहेब बागुल यांची आज शनिवारी (दि. ३) बिनविरोध निवड करण्यात आली.आवर्तननुसार संगीता देवरे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदाच्या निवडीसाठी आज शनिवारी पालिकेच्या सभागृहात बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सभा बोलावली होती. या पदासाठी निर्धारित वेळेत शहर विकास आघाडीचे प्रभाग क्र मांक एकचे नगरसेवक बाळासाहेब बागुल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे तहसीलदार हिले यांनी बागुल यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. बिनविरोध निवड झाल्याने बागुल यांचा नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सन्मान केला. तसेच प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी हेमलता डगळे (हिले) यांनी बागुल यांचा सन्मान केला. याप्रसंगी मावळत्या उपनगराध्यक्ष संगीता देवरे, आघाडीचे गटनेते राकेश खैरनार, राष्ट्रवादीचे गटनेते काका सोनवणे, भाजपाचे गटनेते महेश देवरे, पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, आरोग्य सभापती दीपक पाकळे, नगरसेवक मनोहर देवरे, नगरसेवक पुष्पा सूर्यवंशी, निर्मला भदाणे, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव , भारती सूर्यवंशी, सोनाली बैताडे, सुवर्णा नंदाळे, शमा मन्सुरी, आस्थापना अधिकारी माणिक वानखेडे आदी उपस्थित होते.@सटाणा शहर विकास आघाडीचे बाळासाहेब बागुल यांच्या रूपाने प्रथमच आदिवासी भिल्ल समाजाला पालिकेच्या इतिहासात उपनगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. बांधकाम मजूर असलेले बागुल येथील सुकेडनाला आदिवासी वस्तीतील रहिवासी आहे. त्यांनी प्रभाग क्र मांक एकमध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण यांचे सासरे कांतिलाल चव्हाण यांचा पराभव करून विजय प्राप्त केला होता.
सटाणा उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब बागुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 7:09 PM