नाशिक : महाराष्ट्रावर कोरोनासोबतच निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे संकट ओढावले असून या संकटाचा शासन व प्रशासनाने यशस्वी सामना केल्याचे नमूद करतानाच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशानाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे होताच लवकरच नूकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.निसर्ग चक्रीवादळ वादळ कोकणातून नाशिक, अहमदनगर व उत्तर महाराष्ट्रातून जाणार याची जाणीव तीन ते चार दिवस अगोदर होती, त्यामुळे शासन-प्रशासन सावध होते.त्यामुळे चक्रीवादळातील नूकसानग्रस्तांना तत्काळ अत्यावश्यक मदत पोहोचविणे शक्य झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या चक्रीवादळात जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील झालेल्या नुकसानींचे पंचनामे सुरू असून ते दोन दिवसात ओटोपून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या असून लवकरच शासनस्तरावर मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व केलेल्या पूर्वतयारीमुळे आपण निसर्ग चक्रीवादळाचा सामना करू शकलो, असेही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना व निसर्ग चक्रीवादळासंदर्भातील वस्तुस्थितीविषयी बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली.
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे करा :बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:16 PM
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे होताच लवकरच नूकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळाचा यशस्वी सामना वादळाच्या संकटात प्रशासनाचे यशस्वी प्रयत्न थोरात यांनी केल्या दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना