शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

मानोरी परिसरात अवकाळी पावसाने बळीराजा चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 9:58 PM

मानोरी : परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन आदींसह पिकांच्या सोंगणीला वेग आलेला असतांना सलग दोन दिवस पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली.

ठळक मुद्देकांदा लागवड आणि मक्याचा चारा या अवकाळी पावसामुळे धोक्यात

मानोरी : परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन आदींसह पिकांच्या सोंगणीला वेग आलेला असतांना सलग दोन दिवस पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली.शनिवारी, रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान तर रविवारी (दि. १८) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली. नव्याने सुरू असलेली लाल कांदा लागवड आणि मक्याचा चारा या अवकाळी पावसामुळे धोक्यात आला आहे. यंदा परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या आठ- दहा दिवसांपासून परिसरात मका, सोयाबीन सोंगणी कामात शेतकरी व्यस्त असून अवकाळी पावसाच्या धास्तीने शक्य होईल तेव्हढ्या लवकर शेतमाल सुरक्षित घरी नेऊन टाकला जात आहे. चारा अद्यापही शेतातच पडून असून अवकाळी पाऊस असाच चालू राहिला तर जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. यावर अनेक ठिकाणी पर्याय म्हणून शेतकरी शेतातच मक्याची कुट्टी करून घरी साठवत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी