नांदगाव : तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. शंंभरहून अधिक बैलगाड्यांपैकी अवघ्या पाचच बैलगाड्या कार्यालयाच्या आवारात आणण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला होता.यंदा वीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने दहा टक्के पेरण्यादेखील धड होऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यातील सर्वात मोठी भीषणता निर्माण झालेल्या तालुक्यात दिलासा देणारी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचा आरोप मोर्चेकरी शेतकºयांनी केला. पाचच बैलगाड्या पाठवा अथवा पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन या अशी भूमिका स्वीकारणाºया प्रशासनाने नंतर नमते घेत संतप्त शेतकºयांचे निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मंगळवारी सकाळी शासकीय विश्रागृहाला बैलगाड्यांच्या तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तळवाडे, साकोरा, मूळ डोंगरी , जामदरी, नवे पांझण, हिंगणवाडी आदी पंचक्र ोशीतील शेतकºयांच्या बैलगाड्यांच्या गर्दीने विश्रामगृह फुलले होते. शेतकºयांच्या मोर्चाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार भारती सागरे यांनी सामोरे यावे, अशी विनंती करण्यात आली. आढेवेढे घेणाºया तहसीलदारांना दुष्काळाचे गांभीर्य नाही असे आम्ही समजू, अशी भूमिका मोर्चाचे नेतृत्व करणारे सुभाष कुटे यांनी घेतल्यावर त्या निवेदन स्वीकारण्यासाठी आल्या. तहसीलवर निघालेला मोर्चा ही सुरु वात असून, आझाद मैदान ते मंत्रालयपर्यंत बैलगाड्यांचा असाच मोर्चा काढू व मंत्रालयाच्या दारात दुष्काळी भागातील बैल बांधू असा इशारा सुभाष कुटे यांनी दिला आहे.उपाययोजना कराव्याततालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करपलेल्या खरिपातील पिकांचे पंचनामे व्हावेत, प्राथमिक नजर आणेवारी लवकर घोषित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, टँकरच्या संख्येत वाढ करून तातडीने सुरू करावेत यासोबत दुष्काळसदृशतेवर दिलासादायक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
नांदगाव तहसीलवर बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:43 AM
नांदगाव तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.
ठळक मुद्देतालुक्यात वीस टक्के पाऊस : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी