ममदापूर : श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची पालखी आणि मेंढ्यांचा कळप ममदापुरातून नांदगाव तालुक्यातील तांबेवाडीकडे रवाना झाला.श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची पालखी व मेंढ्यांचा कळप काही दिवसांपूर्वी ममदापूर येथे दाखल झाला होता. पंचक्रोशीतील भाविकांनी कोविड नियमाचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतला.बाळूमामांच्या मेंढ्यांना व पालखीला घराजवळ आसरा दिल्यास शेतात पीक उत्तमरीत्या येते व घरातील आर्थिक स्थिती सुधारून दुष्ट शक्तींचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ममदापूर, राजापूरसह परिसरातील अन्नदात्यांकडून दररोज सकाळ व सायंकाळ आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात येत होता. सद्गुरु बाळूमामा यांच्या मेंढ्यांचे एकूण १५ कळप असून, त्यात ३० हजारांहून अधिक मेंढ्या आहेत. बाळूमामांच्या मेंढ्या महाराष्ट्रात विविध दिंड्यांच्या माध्यमातून फिरत असून, प्रत्येक कळपात अंदाजे २ हजार मेंढ्या आहेत. त्याचबरोबर बाळूमामांचा एक घोडादेखील आहे.ममदापूर गावातून बाळूमामा यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. बाळूमामांच्या नावाने चांगभलंच्या नामघोषात भंडारा उधळत निघालेल्या पालखी मिरवणुकीत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, महिलांनी सडा, रांगोळी करत पालखीचे पूजन केले. गावातील सुवासिनींनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. येथील मानपान घेऊन पालखी नांदगावकडे निघाली. ममदापूरकरांनी शिवापर्यंत पालखीला साथ केली. पालखीसह मेंढ्या, घोडा तांबेवाडीच्या दिशेने रवाना झाला.
ममदापुरातून बाळूमामांच्या मेंढ्या तांबेवाडीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:03 AM
ममदापूर : श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची पालखी आणि मेंढ्यांचा कळप ममदापुरातून नांदगाव तालुक्यातील तांबेवाडीकडे रवाना झाला.
ठळक मुद्देह्यचांगभलंह्णचा जयघोष अन् भंडार्याच्या उधळणीत पालखी मिरवणूक