शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

मांगोणे येथील बंधारा फुटण्यापासून वाचला

By admin | Published: August 06, 2016 12:33 AM

अनर्थ टळला : गटविकास अधिकाऱ्यांची सतर्कता

पेठ : दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने मांगोणे येथील पाझर तलाव १०० टक्के भरला खरा; मात्र या बंधाऱ्याचा सांडवा बंद झाल्याने बंधाऱ्यात क्षमतेपेक्षा अधिक पाणी साठवण झाल्याने बंधारा फुटतो की काय अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. सरपंच उषा गवळी यांनी ही बाब पंचायत समितीला कळविली.गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम यांनी तात्काळ लघू पाटबंधारे विभागाचे अभियंता लिलके यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बंधाऱ्यात येणाऱ्या पूर पाण्याचा जोर वाढत असल्याने कोणत्याही क्षणी वरून पाणी जाऊन बंधारा फुटू शकतो अशी स्थिती निर्माण झाली असताना बहिरम यांनी मांगोणे गावातील मजूरांच्या साह्याने संततधार पावसात सांडवा मोकळा केला त्यामूळे पाण्याची पातळी कमी झाली. या बंधाऱ्याच्या खाली शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर भातशेती केली असून दुर्देवाने बंधारा फुटला असता तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. प्रशासकिय आधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सतर्कतेमुळे हा बंधारा वाचला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने धोका टळला आहे. (वार्ताहर )