नाशिक : शहरात गोविंदनगर भागात सापडलेला कोरोनाचा पहिला रु ग्ण पूर्णत: बरा होऊन त्याला घरी पाठविण्यात आले असले तरी या भागात संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधाचे निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहणार आहेत. यासंदर्भात शासनाच्या आदेशाच्या आधारे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही आदेश जारी केले आहेत.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिन्यात २३ तारखेपासून लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर निफाड तालुक्यात पहिला रुग्ण आढळला होता. शहरात दक्षता घेतली जात असल्याने सर्व काही सुरक्षित आहे, असे वाटत असताना गेल्या ५ तारखेला गोविंदनगर परिसरातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. प्रचंड काळजी घेऊनदेखील रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. महापालिकेने या रुग्णाच्या संचारामुळे अन्य कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली होती. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बाधित रुग्ण ज्या अपार्टमेंटमध्ये राहात आहे, त्याच्या त्या इमारतीपासून तीन किलोमीटर परिघाचा परिसर १४ दिवसांसाठी सील केला. त्यानुसार प्रियंका नेस्ट अपार्टमेंट तसेच इंदिरानगर बोगद्याजवळील जॉगिंग ट्रॅक तेथून एचडीएफसी बँक, जनहित हॉस्पिटल जवळील डॉ. आवारे हॉस्पिटल, डॉ. पिंप्रीकर क्लिनिक, अश्विनी हॉस्पिटल, भावसार भवन, चौक नं. चार, न्यू इरा इंग्लिश स्कूलच्या लगतच्या परिसराचा यात समावेश होता. या प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिक बाहेर येऊ शकणार नाही व बाहेरील व्यक्तीही या ठिकाणी जाऊ शकणार नाही, असे निर्बंध घालण्यात आले होते व आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात साथरोग अधिनियम १९८७ नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. याठिकाणी महापालिकेने वैद्यकीय पथकामार्फत तपासणी सुरू केली होती.दरम्यान, उपचार सुरू असलेल्या या रुग्णावर उपचार केल्यानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. दोन वेळा ही तपासणी अनुकूल असल्याचे आढळल्यानंतर त्याला त्याला सुखरूपपणे रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील प्रतिबंधित क्षेत्र हटेल अशी रहिवाशांची अपेक्षा होती.सिडकोत सर्वेक्षण पूर्णनाशिक शहरात विविध पाच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या रुग्णांच्या परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी ५४ पथकांमार्फत तपासणी मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ३५५९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यातील सिडको भागातील बाधित रुग्णांच्या घरांच्या परिसरातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, मात्र अन्यत्र सुरू आहे.
गोविंदनगरला १८ मेपर्यंत प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 2:02 AM
शहरात गोविंदनगर भागात सापडलेला कोरोनाचा पहिला रु ग्ण पूर्णत: बरा होऊन त्याला घरी पाठविण्यात आले असले तरी या भागात संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधाचे निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहणार आहेत. यासंदर्भात शासनाच्या आदेशाच्या आधारे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही आदेश जारी केले आहेत.
ठळक मुद्देआयुक्तांचे आदेश : शासन निर्णयाचा घेतला आधार