आझादनगर : महापौरांच्या तपासणी पथकाने पाहणी करून महागठबंधनच्या पाच नगरसेवकांच्या वॉर्डातील बोगस कामांची यादी यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्याच यादीत महापौरांच्या वॉर्ड क्रमांक २० येथील २५ बोगस कामांचा समावेश असल्याने महापौर शेख रशीद यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. बुलंद एकबाल पुढे म्हणाले की, ४ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत महागठबंधनच्या पाच नगरसेवकांच्या वॉर्डातील सुमारे तीन कोटी रुपयांचे बोगस कामे झाली असून, त्या कामांची यादी सादर करण्यात आली होती. त्याच यादीत महागठबंधन-कडून आक्षेप घेण्यात आलेल्या ३७ कामांपैकी २५ कामांचा यादीत समावेश करून शहराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सत्ताधारी पक्षाकडूनच महागठबंधन आघाडीने आक्षेप घेतलेल्या कामांवर शिक्कामोर्तब झाला आहे. तत्कालीन काँग्रेसचे नगरसेवक रिजवान खान व अस्लम अन्सारी यांनी सुचविलेल्या कामांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले की, वॉर्ड क्रमांक २० येथील ३७ कागदोपत्री कामांबाबत १६ आॅगस्ट रोजी मनपा आयुक्तांशी चर्चा करीत चौकशीबाबत पत्र दिले आहे.नगरसेवक एजाज बेग यांनीही एकही काम बोगस झाल्याचे सिद्ध केल्यास राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. यावेळी नगरसेवक मो. आमीन मो. फारूख, मुस्तकिम डिग्नीटी, अब्दूल बाकी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापौरांच्या वॉर्डातील कामेच बोगस : आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 11:59 PM
आझादनगर : महापौरांच्या तपासणी पथकाने पाहणी करून महागठबंधनच्या पाच नगरसेवकांच्या वॉर्डातील बोगस कामांची यादी यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्याच यादीत महापौरांच्या वॉर्ड क्रमांक २० येथील २५ बोगस कामांचा समावेश असल्याने महापौर शेख रशीद यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
ठळक मुद्देबोगस कामांची यादी यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती.