युवक कॉँग्रेसकडून योगींना बांगड्याची भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 08:15 PM2019-08-01T20:15:43+5:302019-08-01T20:16:08+5:30

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणारे भारतीय ...

Bangi presents Yogi with Youth Congress! | युवक कॉँग्रेसकडून योगींना बांगड्याची भेट !

युवक कॉँग्रेसकडून योगींना बांगड्याची भेट !

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी योगी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले.

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीप सेंगर यांना पाठिशी घालणारे मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात गुरूवारी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून त्यांना बांगड्यांची भेटीचे कुरियर रवाना केले. यावेळी कार्यकर्त्यांनी योगी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले.


उन्नाव येथील घटनेने वेगळेच वळण घेतले असून, कॉँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी या साऱ्या घटनेस उत्तर प्रदेशचे सरकार जबाबदार असल्याचे म्हटल्याने भाजपाने सैंगर यांना पक्षातून निलंबीत केले आहे. या साºया घटना लक्षात घेता गुरूवारी सायंकाळी पाच वाजता युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस भवनासमोर एकत्र येत योगी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली तसेच त्यांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन केले. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव म्हणायचे व दुसरीकडे महिला, मुलींवर अत्याचार करायचा ही भाजपाची निती राहिली असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. उत्तर प्रदेशात महिला, मुलींचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोघांना बांगड्यांचा आहेर कुरीयरद्वारे रवाना केला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, कल्याणी रांगोळे, बबलू खैरे, सलमान काझी, आकाश घोलप, नाना गाडे,धनंजय कोठूळे, आण्णा मोरे, रमेश देवगिरे, गणेश धोंगडे, सनी शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Bangi presents Yogi with Youth Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.