नाशिक : वेश्या व्यवसायासाठी मावशीने भाचीला बांगलादेशातून भारतात फिरविण्याच्या बहाण्याने नाशिकमध्ये आणत सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणाºया कुंटणखान्याच्या दलालामार्फत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीनेच बुधवारी कथन केला. दलालांनी बांगलादेशमधून पंधरा ते वीस मुली नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात आणल्याचे भीषण वास्तव पीडितेने जीव मुठीत घेऊन प्रसारमाध्यमांना सांगितले.बांगलादेश हा भारताचा शेजारी असून अल्पवयीन मुलींची वेश्या व्यवसायासाठी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार देहविक्रयच्या नरकातून बाहेर पडलेल्या पीडितेने उघड केला. पीडितेने बुधवारी दुपारी माध्यम प्रतिनिधींसमोर दहा महिन्यांपासून आपबिती सांगितली. मूळ बांगलादेशच्या पीडितेला तिच्या मावशीने नाशकात आणत मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये चालणाºया कुंटणखान्यातील ‘नानी’कडे दलालांमार्फत तिचा सौदा केल्याचे पीडितेने सांगितले. नानीच्या दलालांनी या ठिकाणी या अल्पवयीन बालिकेवर दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर नानीने तिला मुंबईच्या कुं टणखान्यात विकले. येथील महिलेने तिच्याकडून बळजबरीने देहविक्रय करून घेत कोलकाताच्या दलालांना विक्री केल्याचे तिने सांगितले. कोलकात्याहून कशीबशी सुटका करून तीन महिन्यांपूर्वी पीडिता नाशिकला परतली. तिने मावशीमार्फत ओळख झालेल्या मित्राशी संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर हे दोघे नाशकात सातत्याने घर बदलून राहात होते. दोघांच्या जिवाला धोका असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी कुठलीही मदत केली नसल्याचा आरोपही तीने केला आहे.पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पीडितेची मुंबईला विक्रीदेहविक्रयसाठी प्रवृत्त केलेल्या पीडित मुलीला शोधून सुखरूपपणे बांगलादेशमध्ये पोहचविण्याचा दावा त्यावेळी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांनी केला होता; मात्र अखेर जीव मुठीत धरत त्या मुलीने नाशिकमध्येच येऊन प्रसारमाध्यमांकडे घडलेली हकिगत सांगून पोलिसांचा दावा फोल ठरविला. या प्रकारामुळे सिन्नर पोलीसही सेक्स रॅकेट प्रकरणात गुंतल्याचे समोर येत असून, पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.अवैधरीत्या ‘बॉर्डर क्रॉस’ करण्यास प्रवृत्तभारत-बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या जंगल, नदीच्या मार्गे पीडीतेला तिच्या मावशीने भारतात आणत नाशिकच्या दलालाकडे सोपविले. या दलालाने पिडीतेला वर्षभरापूर्वी सिन्नरच्या ‘नानी’कडे सुपूर्द केले. नानीने तिला मुंबईच्या एका महिलेला विकले. तेथून कोलकाताला विकले गेले. तेथे महिला दलालाने ५० हजार रुपये देऊन तीची सुटका करून घेत कोलकात्याच्या वेश्या बाजारात तीची विक्री केल्याचा आरोप आहे.मदतीसाठी पुढे आलेल्या युवकाच्या जिवावरही बेतलेवेश्या व्यवसायाला ‘खाकी’चे उघड संरक्षण असल्याचा प्रकार सांगलीनंतर सिन्नरमध्ये उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. या दोघांना पोलीस अधीक्षकांकडे सोपविले गेले आहे. आमच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे पिडीतेने सांगितले.बनावट आधार कार्ड अन् पारपत्र पीडितेला भारतात आणण्यापूर्वी तिचे बनावट पारपत्र व आधार कार्ड तयार करण्यात आले. यासाठी दोन हजारांचा खर्चही तस्करांनी केला. सिन्नरला आल्यानंतर तिचे मतदार परिचय कार्ड (शेषन कार्ड) तयार करण्यात आले. अशा पद्धतीने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारत-बांगलादेशमधील मुलींची तस्करी दलाल संगनमताने करत असल्याचे उघड झाले आहे.
बांगलादेशी मुलीची कुंटणखान्यात विक्रीपोलिसांचा फाटला बुरखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:37 AM
नाशिक : वेश्या व्यवसायासाठी मावशीने भाचीला बांगलादेशातून भारतात फिरविण्याच्या बहाण्याने नाशिकमध्ये आणत सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणाºया कुंटणखान्याच्या दलालामार्फत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीनेच बुधवारी कथन केला. दलालांनी बांगलादेशमधून पंधरा ते वीस मुली नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात आणल्याचे भीषण वास्तव पीडितेने जीव मुठीत घेऊन प्रसारमाध्यमांना सांगितले.
ठळक मुद्देबांगलादेशी मुलीची कुंटणखान्यात विक्रीपोलिसांचा फाटला बुरखा : मावशीनेच ढकलले देहविक्री व्यवसायात