नांदगाव: भारतीय स्टेट बँकेच्या भोंगळ्या कारभाराने ग्राहक त्रस्त झाले असून दि .१३ रोजी कॅशियर ने ग्राहकाला चक्क पाच हजार कमी दिले होते. नांदगांव शाखा भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहक किसन सौंदाणे ( वय ६२) यांनी दोन तास रांगेत ताटकळतच उभे राहून पैसे काढतांना २० हजार रु पयांची स्लीप.भरली व कॅशियर संजीवकुमार यांनी ग्राहकाच्या हातात फक्त १५ हजार रु पये दिले. यावेळी ग्राहकाने पैसे मोजले व कॅशियरला विचारणा केली ५ हजार रु का कमी दिले अशी विचारणा केली असता कॅशिअर म्हणाले कँमेरात बघून सांगतो तो पर्यंत थांबा. त्यांच्या सोबत लहान नातू होता तहान लागल्याने तो सारखा पाणी मागत होता. सायंकाळी पाच वाजता बँकेतील रोखीचा हिशेब झाल्यावर सौंदाणे यांना सदर रक्कम मिळाली. मात्र काही चूक नसतांना पाच हजारासाठी लहानग्या नातू बरोबर पाच तास बँकेत बसावे लागले. कारण तोपर्यंत त्यांना बँक सोडता येत नव्हती.बँकेत पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने प्रत्येक खिडकीसमोर रांगा लागलेल्या असतात. याशिवाय बाहेरगावचे धनादेश लवकर वटत नसल्याची तक्र ार आहे. त्यासाठी स्कॅनरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. आर. टी जी एस किंवा एन इ एफ टी करतांना देखील ग्राहकांची फिरवा फिरवी होत असते.
कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे बॅँकेच्या ग्राहकाला त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 5:46 PM