बागलाण तालुक्यातील फोफिर, बिजोटे, कोळीपाडा, बिजोरसे,रामतीर, नवे निरपूर येथील शेतकऱ्यांनी शहरातील मालेगाव रस्त्यावरील त्या बँकेच्या कर्मचाऱ्याकडून कर्ज खाते निल करण्यासाठी दिलेल्या ३६ लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक झाल्याची असल्याची तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान, कोणतीही कारवाई न झाल्याने काल सोमवारी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेच्या कार्यालयावर हल्लाबोल केल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
--------------------
गुन्हा दाखल करण्यास तांत्रिक अडचण
आमदार दिलीप बोरसे यांनी हस्तक्षेप करून दोषी तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सटाणा पोलिसांत धाव घेतली. मात्र, कारवाईसाठी पुरेशी कागदपत्रे सादर न केल्याने गुन्हा दाखल करण्यास तांत्रिक अडचण येत असल्याचे सांगून पोलीस यंत्रणा बँक प्रशासनाकडे बोट दाखवत आहे तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा तक्रार घेतल्यास जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचे सांगून बँक प्रशासनाने एकप्रकारे हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दोघांच्या भांडणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून याबाबत आपण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले.