दिंडोरी : बँक खाजगीकरणाच्या विरोधात दोन दिवस पुकारण्यात आलेल्या बंदमुळे दिंडोरी तालुक्यातील बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.तालुक्यातील प्रमुख बँकां खासगीकरणाच्या विरोधात एकवटल्याने दिंडोरी शहरासह तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका या संपात उतरल्याने बँकांचे संपूर्ण कामकाज ठप्प होते. दिंडोरी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया,युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र या प्रमुख बँकांसह काही खासगी बँकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने व्यापारी वर्गासह शेतकरी बांधवांची मोठी अडचण झाली.
तालुक्यातील जानोरी, मोहाडी, खेडगाव, वणी, लखमापूर, उमराळे, ननाशी येथील बँकांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्ष हंगाम सुरु असल्याने शेतकरी वर्गाचे नोकरदार वर्गाचे बँक संपामुळे मोठी गैरसोय होत आहे. (१६ दिंडोरी बँक)