नाशिक : सातव्या वेतन आयोगाच्या फरकारची रक्कम काढून देणे व नियमित पगाराच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून नाशिक डिस्ट्रीक्ट सेकंडरी टिचर्स अॅन्ड नॉन टिचिंग एम्प्लॉई सहकारी सोसायटीचे दोघा शाखा व्यवस्थापकांनी १० जून रोजी लाचेची रक्कम स्विकारली होती. या गुन्ह्यात सोसायटीचे अध्यक्ष रामराव केदूजी बनकर यांचा सहभाग तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना बुधवारी (दि.१) अटक केली.याबाबत अधिक माहिती अशी, जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची मुख्य सहकारी सोसायटी असलेली ह्यएनडीएसटीह्णचे शाखा व्यवस्थापक शरद जाधव व व्यवस्थापक जयप्रकाश कुंवर यांना १० जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात अटक केली होती. याची तक्र ार मिळताच विभागाने सापळा रचून दोघांनाही अटक केली होती. दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. त्यानुसार विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांच्या पथकाने बनकर यांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे या लाचेच्या प्रकरणाचे धागेदारे आता सोसायटीच्या संचालकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सखोल चौकशीत सोसायटीतील अनेक गैरप्रकारदेखील प्रकाशझोतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुन्ह्यात सहभाग : शिक्षक कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष बनकर यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 9:41 PM
दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले.
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई