नाशिक : बँक कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती संदर्भात १ ते ७ श्रेणींमध्ये भेद न करता सर्व श्रेणींसाठी एकाच यंत्रणेच्या माध्यमातून म्हणजेच इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) वेतन निश्चिती करण्यात यावी तसेच बँकाचे विलिनीकरण रोखण्यात यावे यासाठी मागणी आॅलइंडिया बँक आॅफिसर कॉन्फेंड्रेशन संघटनेने शुक्रवारी (दि.२१) लाक्षणिक संप पुकारून आंदोलन केले. त्यामुळे शाहरासह संपूर्ण जिल्ह्यातील बँकिंग व्यवस्था विस्कळीत झाली. या संपात नाशिक जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयीकृत बँकाच्या सुमारे तीनशेहून अधिक शाखांच्या अधिकाºयांनी सहभाग घेतलेल्याने या सर्व शाखा बंद राहून सुमारे दोनशे कोटींहून अधिक उलाढाल ठप्प झाल्याची माहिती संघटनेचे मुख्य सचिव शिवाजी पाटील यांनी दिली. दरम्यान, याच मागण्यांसाठी दि. २६ डिसेंबरला पुन्हा एकदिवसीय संप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सीबीएसजवळील स्टेट बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ आॅल इंडिया बँक आॅफिसर संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. त्यात अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांची त्वरित सोडवणूक करण्याचे आवाहन पदाधिकाºयांनी केले. आंदोलनात बँक आॅफ इंडियाचे सुनील गव्हाणे, देना बँकेचे सुनील जाधव यांच्यासह १४ बँकाचे अधिकारी उपस्थित होते. नोटाबंदीनंतर बँकांचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढला असून, गेल्या काही महिन्यांपासून सहकार क्षेत्राचीही पिछेहाट होत आहे.अनेक संघटनांचा विरोधबड्या उद्योगपतींनी कर्ज बुडविल्याने काही बँकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. यावर योग्य उपाय म्हणून केंद्र शासनाने, ज्या बँका तोट्यात आहेत, त्या इतर बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु या प्रस्तावाला आॅलइंडिया बँक आॅफिसर कॉन्फेंड्रेशनसह अन्य संघटनांनीही विरोध दर्शविला आहे.
संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:48 AM