शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

जिल्ह्यातील बॅँकांमध्ये गर्दी कायम

By admin | Published: November 16, 2016 12:45 AM

ठिकठिकाणी रांगाच रांगा : ग्रामीण भागातील ग्राहकांची तारांबळ

नाशिक : बॅँकांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी सलग सहाव्या दिवशीही रांगा कायम असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सोमवारी सुटीनंतर आज मंगळवारी पुन्हा नोटा बदलण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी पाहावयास मिळत आहे. नोटा जवळ आहेत पण सुटे मिळत नसल्याने साधी भाजी खरेदी करणे ग्राहकांना कठीण होऊन बसले आहे. हीच परिस्थिती बहुतांश व्यावसायिकांचीदेखील झाली आहे. किराणा किंवा इतर व्यापारी मोठ्या नोटा घेत असल्याने घाऊक खरेदी करताना ग्राहकांची फारशी अडचण झाली नाही, मात्र छोटे विक्रे ते आणि किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक अडचण झाल्याने अनेक ठिकाणी वादविवाद घडत होते.उमराणे बाजार समिती बंदउमराणे : पाचशे व हजार रु पयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे अदा करण्यासाठी व्यापारीवर्गाकडे नवीन छोट्या व मोठ्या स्वरूपातील नोटांचे चलन उपलब्ध होत नसल्याने बुधवारपासून (दि. १६) नवीन चलन उपलब्ध होईपर्यंत काही दिवसांसाठी उमराणे बाजार समिती बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सभापती विलास देवरे यांनी दिली. जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समित्या पाचशे व हजार रु पयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने एक दोन दिवस आधीच बंद करण्यात आल्या होत्या. परंतु व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात चलन उपलब्ध असल्याने येथील बाजार समितीतील कांदा व भुसार माल खरेदी-विक्र ीचे व्यवहार सुरू होते. परिणामी अन्य बाजार समित्या बंद असल्याने येथील बाजार समितीत मागील आठवड्याच्या शेवटी उन्हाळ (गावठी) काद्यांची सुमारे ५६ हजार क्विंटल, तर लाल (पावसाळी) कांद्याची सुमारे २६ हजार क्विंटल इतकी प्रचंड आवक झाली होती. आवक असतानाही लाल कांद्याचे भाव तेजीत होते. उन्हाळ कांद्यास सर्वोच्च ९०० रु पये, तर लाल कांद्यास सर्वोच्च १८५० रु पये प्रतिक्विंटलपर्यंत भाव होता. परंतु चालू आठवड्यात नवीन चलनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवणार असल्याने बुधवारपासून नवीन चलन उपलब्ध होईपर्यंत काही दिवसांसाठी उमराणे बाजार समिती बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने घेतला आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ कांद्याचे भाव तेजीत राहतील या अपेक्षेपोटी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. नागरिक मेटाकुटीसअभोणा : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा जमा करून नव्या नोटा घेण्यासाठी तिसऱ्या-चौथ्या दिवशीही सर्वच बँकांबाहेर तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. रविवारीही बँका सुरू असल्याने गर्दी वाढलेली होती. नोटा जमा करण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी सर्वसामान्यांची अवस्था झाली आहे.मागील तीन ते चार दिवसांपासून ५०० व १००० रु पयांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे जुन्या नोटा बदलण्यासाठी व स्वीकारण्यासाठी नागरिकांची बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. बँकांमध्ये नवीन दोन हजाराच्या मर्यादितच नोटा असल्याने त्या बदलून घेणे सर्वांना शक्य झाले नाही. दुपारनंतर एटीएम मशीन व बँकांमध्ये खडखडाट दिसून आला. यामुळे बऱ्याच नागरिकांना रांगेत उभे राहून वेळ व दिवस वाया घालवावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. दुसरीकडे ज्या नागरिकांना दोन हजार रुपयांची नोट मिळाली त्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व्यवहाराच्या ठिकाणी सुटे पैसे नसल्याने खरेदीसाठी अडचण निर्माण होत आहे. चोरट्यांचा दहा, शंभरच्या नोटांवर डल्ला घोटी : काळ्या पैशांवर अंकुश यावा यासाठी सरकारने चलनातील हजार व पाचशेच्या चलनी नोटा व्यवहारातून बाद केल्यानंतरही घोटी शहरातील घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण काही थांबत नाही. दरम्यान, चोरट्यांनी जुन्या नोटांकडे पाठ फिरवीत आता घरगुती साहित्य चोरण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले असल्याने या घरफोड्या चोरीची उकल करणे पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे.  गेल्या चार महिन्यांपासून घोटी शहरात धाडसी घरफोड्या, दुकानाचे शटर तोडून चोऱ्या असे प्रकार सलगपणे घडत होते. मात्र हजार व पाचशे रु पयांच्या चलनी नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर चोरी व घरफोडीच्या प्रकाराला लगाम मिळेल असे अभिप्रेत असताना चोरांनी मात्र शक्कल लढवीत घरफोडी करीत घरगुती वापराच्या वस्तू चोरण्यास सुरु वात केली आहे.  शहरातील डॉ. आंबेडकरनगरमधील अंजना दिलीप रोकडे या आपल्या कुटुंबासह मुंबई येथे लग्नासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन गॅस सिलिंडर, एक मोबाइल व दहा हजार रु पये रोख, केवळ दहा आणि शंभराच्या नोटा चोरट्यांनी लंपास केल्या. दरम्यान, रोकडे कुटुंब लग्नावरून आल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी याबाबत घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी पैशाऐवजी घरगुती वस्तूंना लक्ष्य केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.