नाशिक : मतदानप्रक्रियेबाबत मतदारांची जनजागृती व्हावी आणि सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात ‘वोट कर नाशिककर’ अभियानासह, निवडणूक साक्षरता क्लब, शालेय विद्यार्थी व पालकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती सुरू असताना आता विविध बँकांनीही मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी बँक आॅफ महाराष्ट्र, एचडीएफसी यांसारख्या बँकांनी आपल्या ग्राहकांना बल्क मेसेजद्वारे मतदानाचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी, माझ्या भविष्यासाठी मतदान करा! या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना पत्राच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनुसार शाळांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘वोट कर नाशिककर’ या मोहिमेच्या माध्यमातून ५२ वर्षांतील सर्वाधिक मतदानाचा विक्रम नोंदविला गेल्याचा दावा जिल्हाधिक ाऱ्यांकडून करण्यात आला असून, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा टक्का आणखी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएम जनजागृतीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या प्रयत्नात आता बँक आॅफ महाराष्ट्र आणि एचडीएफसीसारख्या बँकांसह काही शासकीय व निमशासकीय आस्थापनांनीही सहभाग घेतला असून, या संस्था बल्क मेसेजद्वारे मतदारांना २१ आॅक्टोबरला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.बँकेच्या खात्यातून नेहमी विविध कपातीसंदर्भात वेगवेगळ्या स्वरूपाचे मेसेज येतात, तर क धी तरी आपल्या खात्यात पैसे जमा झाल्यास तसा मेसेज बँकेद्वारे आपल्या मोबाइलवर येतो; परंतु सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकांनी मतदार जागृतीसाठी बल्क मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे; मात्र बँकेच्या मेसेजमुळे मतदार जागृतीचा उद्देश सफल होताना दिसत आहे.
मतदार जागृतीसाठी बँकांचाही पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:01 PM