शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

बापरे... २४ तासांत ६१५ बाधित; सहा बळीकोरोनाचा कहर : गोंदे-वाडीवºहेत १०० बाधित; सिन्नर, निफाड, दिंडोरीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:59 AM

नाशिक : महानगरासह जिल्ह्यात कोरोनाने शुक्रवारी (दि.१७) अक्षरश: थैमान घातले. दिवसभरात तब्बल ६१५ जणांना कोरोनाची बाधा झाली तर सहा ...

नाशिक : महानगरासह जिल्ह्यात कोरोनाने शुक्रवारी (दि.१७) अक्षरश: थैमान घातले. दिवसभरात तब्बल ६१५ जणांना कोरोनाची बाधा झाली तर सहा जणांनाही बळी गेला. बाधितांत नाशिक मनपा हद्दीतील ४०७ रुग्णांचा समावेश आहे. महानगरातील ५ जणांसह ग्रामीणमधील एक अशा ६ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३७१ वर पोहोचली आहे.नाशिक महानगराने प्रथमच एकाच दिवसात झालेल्या बाधितांमध्ये ४००चा आकडा ओलांडला, तर नाशिक ग्रामीणमध्ये १५१, मालेगावचे७ आणि जिल्हाबाह्य ४३ जणांना बाधा झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ७३९ वर पोहोचली आहे.अ‍ॅँटिजेन टेस्ट आणि निकटवर्तीयांच्या टेस्टचे प्रमाण वाढवण्यात आल्याने बाधितांचा आकडा सहाशेनजीक जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी प्रलंबित अहवालांची संख्या ८८४ वर पोहोचली आहे.सिन्नर तालुक्यात २१ पॉझिटीव्हसिन्नर शहरासह तालुक्यातील रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. शुक्रवारी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व कोवीड केअर सेंटरमध्ये संशयित म्हणून दाखल असलेल्या रुग्णांच्या स्वॅबच्या तपासणीचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले. दिवसभरात सिन्नर शहरात ९ तर ग्रामीण भागात १२ असे २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता कोरोना बाधितांची संख्या ३२३ वर पोहचली आहे.निफाड तालुक्यात नवे १२ रुग्णलासलगाव : निफाड तालुक्यातील विविध गावात गुरुवारी (दि.१६) रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार बारा रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या २८१ असून १७ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.दिंडोरी तालुक्यात रुग्णसंख्या १२३दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूच असून शुक्र वारी ७ बाधितांची वाढ झाल्याने रु ग्णसंख्या १२३ वर पोहचली आहे. दरम्यान उमराळे बु. येथील एका महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने बळींची संख्या चार वर गेली आहे. आतापर्यंत ८१ रु ग्णांनी कोरोनावर मात केली असून ३८ जणांवर उपचार सुरू आहेत.कळवणला कडकडीत बंदकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कळवण तालुका प्रशासन, सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी महासंघ यांनी संयुक्तरित्या शुक्र वारपासून दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवस घोषित केलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.नांदूरशिंगोटे येथे आरोग्य सर्वेक्षणनांदूरशिंगोटे येथे चार कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य विभागाने गावातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या