नाशिक : मद्य दुकानातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीनुसार घरपोचमद्य सेवा देण्यासाठी शासन सरसावले असले तरी नाशिकमधील आभार या बार आणिपरमीट रूम संस्थेच्या वतीने मात्र विरोध केला आहे. वाईन शॉपचालकांनायासंदर्भात झुकते माप दिले जात असल्याची तक्रार आहे. त्याऐवजी बंदस्थितीत असलेल्या परमीट रूम आणि बार चालकांना हे काम दिल्यास त्यांचेनुकसान टळू शकेल असे मत आभारचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केलेआहे.लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून तीजीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुलवाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली. गेल्या दोन महिन्यांपासूनदुकाने बंद असल्याने शासनाने हा निर्णय घेताच मद्य दुकानांवर गर्दीउसळली. ती टाळण्यासाठी टोकन आणि अन्य व्यवस्था करण्यात आल्या असल्या तरीआता ज्यांच्याकडे मद्य सेवनाचा परवाना आहे, त्यांनाच ऑनलाईन मद्य मागवतायेणार आहे. तथापि, ही सुविधा फक्त वाईन शॉपकिपरसाठीच आहे. गेल्या दोनमहिन्याांपासून बार आणि परमीट रूम बंद आहेत. त्यामुळे हॉटेल आणि बार असाएकत्रीत व्यवसाय करणा-यांना आज त्यांच्याकडील वेटर आणि अन्य स्टाफसांभाळावा लागत आहे. बार बंद असल्याने हा सर्व सोसावा लागत असल्याने बारचालक आर्थिक नुकसान सोसत आहेत. शासनाने वाईन शॉप प्रमाणे बार उघडू दिलेनसले तरी किमान ऑनलाईन विक्रीमध्ये बार चालकांचा समावेश करण्याची गरजआहे, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.राज्यात १६ हजाराहून अधिक परमीट रूम आणि बार आहेत. तर वाईन शॉप १६४५आहेत. शॉपमध्ये केवळ एक ते दोन कर्मचारीच असतात. तर बार मध्ये अनेककर्मचारी कामास आहेत. आज आॅनलाईन मद्य दुकानदारांनी द्यायचे ठरवले तरीत्यांच्याकडे कर्मचारीच नाहीत. या उलट परमीट रूम आणि बार चालकांना हे कामदिल्यास त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ आहे. याशिवाय हॉटेल आणि बार अशीएकत्रीत नोंदणी असल्याने झोमॅटो, स्विगी सारख्या घरपोच खाद्य सेवा पुरवणा-यांशी करार केले आहेत. त्यामुळे शॉप पेक्षा बार चालक ही सेवा सहज देऊ शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.
परमीट रूम आणि बार चालक हे वाईन शॉपपेक्षा पाच टक्के अतिरीक्त व्हॅटदेतात. आज बार चालकांना त्यांच्याकडील कर्मचारी वर्ग सांभाळणे अत्यंतकठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने ऑनलाईन बार सेवा ही त्यांच्यामाध्यमातूनच देण्याची गरज आहे. यासंदर्भात राज्य स्तरावर संघटनेनेशासनाला पत्र पाठविले आहे.- संजय चव्हाण, अध्यक्ष