देवळा : छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले व आपल्या आचरणातून प्रगट केले तर सुराज्य यायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन शिवचिरत्रकार यशवंत गोसावी यांनी केले. सोमवारी (दि.१९) शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बाराबलुतेदारांच्या सन्मान कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी सरपंच भाऊसाहेब पगार यांनी प्रास्ताविक केले. अठरापगड जातींना आपल्या स्वराज्यात सामावून घेतांना शिवरायांनी कधीच भेदभाव केला नाही.या पाशर््वभूमीवर शिवजयंतीनिमित्त येथे बारा बलुतेदारांचा यशवंत गोसावी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान गावातून मिरवणूक काढण्यात आली. आयुष भामरे या चिमुकल्याने भारदस्त आवाजात केलेले भाषण आजच्या कार्यक्र माचे खास आकर्षण ठरले. संपूर्ण गावात प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावल्यामुळे गाव भगवेमय दिसत होते.
खुंटेवाडीत बाराबलुतेदारांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:02 AM
देवळा : छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले व आपल्या आचरणातून प्रगट केले तर सुराज्य यायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन शिवचिरत्रकार यशवंत गोसावी यांनी केले. सोमवारी (दि.१९) शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बाराबलुतेदारांच्या सन्मान कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी सरपंच भाऊसाहेब पगार यांनी प्रास्ताविक केले.
ठळक मुद्देबाराबलुतेदारांच्या सन्मान गावातून मिरवणूक काढण्यात आली.