सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक सात हा जुन्या सटाण्याचा काही भाग समाविष्ट असलेला परिसर आहे. बाराबलुतेदारांचा रहिवास असलेला हा प्रभाग असून, पाणीटंचाई, गटारींच्या समस्या आणि याच परिसरात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पालिका प्रशासन मूलभूत सुविधा पुरविण्या ऐवजी जनतेच्या जिवाशी खेळत असल्याची भावना रहिवाशांची आहे. या समस्यांच्या गर्तेतून आपल्याला बाहेर काढणारा कार्यक्षम प्रतिनिधी कसा मिळेल या शोधात येथील मतदार आहेत.शहरातील सोनार गल्ली ,कॅप्टन अनिल पवार चौक, कचेरी रोड, नामपूरकर चाळ,शिंदे वाडा, न्यू प्लॉट हा परिसर या प्रभागात समाविष्ट करण्यात आला. या प्रभागात मराठा ,माळी समाजाचे प्राबल्य असले तरी अल्पसंख्यांकांची संख्या त्याबरोबरीने आहे. या परिसरातील रस्ते दहा वर्षांपूर्वीच चकाचक झाले आहेत. मात्र पाणीटंचाईपासून कधीही हा परिसर मुक्त होऊ शकला नाही. उलट या भागात तुंबलेल्या गटारी व सांडपाणी याच भागात सोडून प्रशासन प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. विद्यमान नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांचा हक्काचा हा गड मात्र त्यांना देखील प्रभागात आपल्या कामाचा ठसा उमट विण्याचा प्रयत्न केला. जुनी कचेरी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी एक कोटी रु पयांचा निधी मिळाला आहे. या प्रभागाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करण्यात आले. अलीकडच्या काळातील प्रतिनिधींनी मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्षच केले असून समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या येथील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर शहराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणाऱ्या कार्यक्षम नगरसेवकाच्या प्रतीक्षेत मतदार दिसत आहे.
समस्यांच्या विळख्यात सापडलेला बाराबलुतेदारांचा प्रभाग
By admin | Published: October 30, 2016 11:21 PM