शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

बरसला वरुणराजा, फास कार्यकारी अभियंत्याला

By admin | Published: July 21, 2016 2:16 AM

अजब : महसूल-पाटबंधारे खात्यात जुंपणार

 नाशिक : गेल्या आठवड्यात धो धो कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यासह पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या प्रशासनालाही दिलासा देत, पालखेड धरणात दर तासाला धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केल्यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मासेमारी करणारे पुरात सापडले, परिणामी त्यांना रेस्क्यू करण्याची वेळ आल्याचे कारण शोधत जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्याला दोषी ठरवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या नोटिसीने पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन वाद पेटण्याची चिन्हे आहेत. पालखेड धरणातून डाव्या कालव्याच्या माध्यमातून येवला व मनमाडसाठी पाणी सोडले जात असल्यामुळे धरणाच्या पाण्याचा फुगवटा न होण्यास मदत होत होती, तरीही पालखेड धरणाची साठवण क्षमता व पावसाचे प्रमाण पाहता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी कादवा नदीत हळूहळू पाणी सोडण्याचा निर्णय घेतला व प्रारंभी दीड हजार व नंतर टप्प्याटप्प्याने ३१ हजार क्यूसेक इतके पाणी सोडावे लागले, परिणामी कादवा नदीला पूर आला. धरणातून ज्यावेळी पाणी सोडले त्याचवेळी पाटबंधारे खात्याने कादवा नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशाराही दिला. याचदरम्यान, कादवा नदीला पुढे अन्य नाल्यांचे पाणी येऊन मिळाल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन तीन ग्रामस्थ पाण्यात अडकले. या तिघांना काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदत घेऊन दहा तासांनंतर सुखरूपपणे बाहेर काढावे लागले. तसे पाहिले तर ही सारी घटना नैसर्गिक आपत्तीत मोडली जात असताना, पाटबंधारे खात्याने पडणारा पाऊस व धरणातील साठा पाहता पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केलेली असताना, नेमक्या या साऱ्या प्रकारास पाटबंधारे खाते जबाबदार असल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाने काढला व पालखेड पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, गंगापूर धरणातून पाणी न सोडताच गोदावरीला पूर येऊन दीड डझन वाहने वाहून गेली, मग त्याला जिल्हा प्रशासन कोणाला जबाबदार धरणार, असा सवाल केला आहे.