नाशिक : रंगपंचमी हा रंगांचा सण. तो सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करतात. पण समाजातील काही घटकांना त्यांच्या वेदना, आजार यामुळे दरवेळी सण साजरे करणे जमतेच असे नाही. पण त्यांनाही अशा सणांच्या माध्यमातून आनंद गवसावा, क्षणभर विरंगुळा मिळावा या हेतूने महिंद्रा आणि महिंद्रा लि., यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही सहजीवन जगणाºया बालकांसाठी महिंद्रा हरियाली, सातपूर एमआयडीसी येथे रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्हीसारख्या आजाराचे सावट या चिमुकल्यांवर न पडू देता सप्तरंगांच्या रंगांप्रमाणेच या बालकांच्या आयुष्यात चांगल्या आरोग्याचा, हर्षाचा, प्रेमाचा, नवीन उमेदीचा, सकारात्मक दृष्टीचा रंग भरण्याचा प्रयत्न अशा उपक्रमाद्वारे केला जात आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महिंद्रा आणि महिंद्रा लि. चे मधुकर टर्ले, प्रदीप भट, कमलाकर घोंगडे, आशितोष अग्निहोत्री आण यश फाउंडेशन अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रंगपंचमी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर येणार गोंडस व्यक्तीचित्र म्हणजे राधा-कृष्णाची जोडी. एचआयव्ही सहजीवन जगणाºया बालकांनी रंगपंचमीचे औचित्य साधून राधा-कृष्णाचा वेश परिधान करून उपस्थित मान्यवरांना रंगाचा टिळा लावून, विविध रंगीबेरंगी फुलांची उधळण करून शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी सर्व बालगोपाळांसोबत कोरड्या रंगांची व फुलांची उधळण करून रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. मधुकर टर्ले यांनी अशा चांगल्या व अनोख्या रंगपंचमी कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. कमलाकर घोंगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुलांना रंगपंचमीचे महत्त्व व संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक एचआयव्ही सहजीवन जगणाºया नागरिकांनी व बालकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
बालगोपाळांनी केली सप्तरंगांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:05 IST
नाशिक : रंगपंचमी हा रंगांचा सण. तो सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करतात. पण समाजातील काही घटकांना त्यांच्या वेदना, आजार यामुळे दरवेळी सण साजरे करणे जमतेच असे नाही.
बालगोपाळांनी केली सप्तरंगांची उधळण
ठळक मुद्देनवीन उमेदीचा, सकारात्मक दृष्टीचा रंग भरण्याचा प्रयत्न विविध रंगीबेरंगी फुलांची उधळण करून शुभेच्छा