नाशिक : आॅगस्ट महिन्यात कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकºयांना चांगले भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी नियोजनपूर्वक कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडेखोरीच असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी केला. आॅगस्ट महिन्यात कांद्याचे क्ंिवटलला भाव २४०० ते २५०० रुपये होते. दिल्लीत कांदा महाग होऊ लागल्यानेच तातडीने आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलावून केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांना ठरवून निशाणा करीत त्यांच्यावर छापेमारी केली. त्यामुळे कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली. कांद्याचे भाव कमी करण्यासाठीच केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला. कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करणेच मुळात चुकीचे आहे. कांद्याला हमीभाव नसताना त्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करायला नको. एकतर कांद्याला हमीभाव जाहीर करा, मगच कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करावा अन्यथा कांद्याला जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळले पाहिजे. कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन करण्याचा प्रहार संघटनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसात चांदवड किंवा अन्यत्र कांदा उत्पादकांची परिषद घेऊन त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांगळे, दत्तू मुतर्डक, अजित आव्हाड, अनिल भडांगे, जगन काकडे, नितीन गवळी, प्रकाश चव्हाण, श्याम गोसावी, जतीन पानमंद, योगेश जाधव, सुशील शिंदे, बबलू मिर्झा, पवन ताडगे आदी उपस्थित होते.१३ आॅक्टोबरला उपोषणअपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी व्हावी, विधवांसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यात यावे, अपंगांसाठी उद्योग व शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा लागू करावी, यामागण्यांसाठी अमरावती येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
कांदा उत्पादक-व्यापाºयांवर सरकारने केली ‘दरोडेखोरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:52 AM