-दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त, नाशिक शहर
----
नाशिक जिल्ह्यात विशेषत: मालेगावात कोरोनाने मागील वर्षी सुरुवातीलाच प्रचंड थैमान घातल्याने ग्रामीण पोलिसांचीही कसोटी लागली होती. ग्रामीण पोलिसांनी रात्रीचा दिवस करत, परिस्थितीशी दोन हात करत मुकाबला केला. निश्चितच ही लढाई इतकी सोपी मुळीच नव्हती. कारण कोरोना रूपाने आलेला शत्रू हा कोणालाही नजरेस पडत नव्हता आणि त्याला हरविण्यासाठी ग्रामीण पोलीस दल मात्र जिवाचे रान करत होते. तहान, भूक, झोप विसरून खाकी वर्दीचा मान राखत समाजाच्या रक्षणासाठी पोलीस ग्रामीण भागात सदैव रस्त्यावर होते. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात नाशकात कर्तव्यावर नव्हतो. मात्र, त्यावेळेची छायाचित्रे, व्हिडीओ बघताना माझ्या अंगावर आजही शहारे येतात. या वर्षी पुन्हा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागालाही कोरोना वेढा देताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने ग्रामीण जनतेने प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा