कळवण : जन्मताच अपंगत्व घेऊन आल्याने अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचे नशीब वाट्याला आल्यामुळे अशा अवस्थेतही जगण्याची आण्णि काही मिळविण्याची जिद्द बाळगणाऱ्या निराधार अपंग विलासला लॉकडाउन काळात कळवण तालुक्यातील नांदुरीनजीक गोबापूरच्या सप्तशृंगी वृद्धाश्रमात हक्काचा आधार मिळाला आहे. यामुळे त्याच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली आहे. हे सत्कर्म कळवणचे उद्योजक गंगा पगार यांच्यामुळे चालून आले आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून कळवण येथील उद्योजक गंगा पगार यांनी नांदुरीजवळ गोबापूर येथे सप्तशृंगी वृद्धाश्रम स्थापन केला असून कुणाचाही आधार नसलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिक येथे वास्तव्यास आहे. वृद्धपकाळात त्यांना ते आधार ठरल्यामुळे विलासदेखील आधार झाला आहे. कळवणच्या बसस्थानक परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून निराधार दिव्यांग विलासचे वास्तव्य होते. दोन्ही पायांनी पूर्णपणे अपंग असल्यामुळे पायाऐवजी हाताने चालण्याचे नशीब त्याच्या वाट्याला आले आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या दोन पैसातून आपल्या पोटाची खळगी भरवण्याची त्याची दिनचर्या ठरलेली असायची. अत्यंत तापट स्वभावाचा असल्यामुळे त्याचं नाव चुकूनही कुणीही घेण्यास धजावत नसतं, बसस्थानक हेच निवारागृह झाले होते. सकाळी स्थानकावर गाणं म्हणून मनोरंजन करून दिवसाची सुरु वात करत असतं.पायाऐवजी हाताने चालताना सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला बघितले. त्याची अवहेलना पाहून त्यांच्यातील माणुसकी जागृत झाली आणि त्यांनी त्याला तीनचाकी सायकल घेऊन दिली. त्याला आपले आई,वडील, भाऊ, बहीण कोण आहेत? कुठे आहेत याची माहिती नाही. कोरोनामुळे देश लॉकडाउन झाला, सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यामुळे विलासची अवहेलना होत होती.पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना गणेशनगर भागात पेट्रोलिंग करताना त्यांच्या नजरेस दुकानाच्या आडोशाला विलास बसल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. वाघ यांनी त्याच्या जेवणाची सोय केली. पोलीस कर्मचारी यांना त्याला आधार दिला. विलासची अवहेलना युवा उद्योजक गंगा पगार यांच्या कानी पोहोचल्यानंतर पगार यांनी गोबापूर येथील सप्तशृंगी वृद्धाश्रमात त्याला नेले. तेथे त्याची सुश्रुुषा करत अंघोळ घातली. घालण्यासाठी नवे कपडे दिले. वृद्धाश्रमाचा आसरा देऊन विलासला जगण्याची नवी उमेद दिली.
निराधार अन् अपंग विलासला ’सप्तशृंगी’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:56 PM
जन्मताच अपंगत्व घेऊन आल्याने अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचे नशीब वाट्याला आल्यामुळे अशा अवस्थेतही जगण्याची आण्णि काही मिळविण्याची जिद्द बाळगणाऱ्या निराधार अपंग विलासला लॉकडाउन काळात कळवण तालुक्यातील नांदुरीनजीक गोबापूरच्या सप्तशृंगी वृद्धाश्रमात हक्काचा आधार मिळाला आहे. यामुळे त्याच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली आहे. हे सत्कर्म कळवणचे उद्योजक गंगा पगार यांच्यामुळे चालून आले आहे.
ठळक मुद्देमाणुसकीचे दर्शन : वृद्धाश्रमात आसरा; जगण्याची नवी उमेद