नाशिक : गरीब आणि गरजूंना अल्पदरात मिळणारी शिवभोजन थाळी लॉकडाऊनच्या काळात मोफत दिली जात असल्याने जिल्ह्यात दररोज सुमारे साडेनऊ ते दहा हजार नागरिकांना शिवभोजन थाळीचा आधार लाभत आहे. जिल्ह्यातील ४५ केंद्रांवर दीडपट अधिक प्रमाणात शिवभोजन थाळी वाटप केली जात असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
‘ब्रेक दि चेन’च्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून उद्योग, व्यवसायांना देखील याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठीची दक्षता घेतली जात आहे. त्या अनुषंगाने शिवभोजन थाळीदेखील पार्सल स्वरूपात दिली जात आहे. जिल्ह्यातील ४५ केंद्रांवर पोळी, भाजी, वरण-भात पार्सल स्वरूपात वितरीत केेली जात असून दररोज सुमारे साडेनऊ ते दहा हजार नागरिक शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत. राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे सद्य:स्थितीत सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी बंद असून त्यांना केवळ मर्यादित वेळेत पार्सलची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रांवर देखील ग्राहकांसाठी पार्सलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गरीब, गरजूंसाठी पार्सलच्या माध्यमातून मोफत जेवण दिले जात आहे. जिल्ह्यातील ४५ केंद्रांवर दररोज ७ हजार थाळी वितरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, कोरोनामुळे थाळीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा यासाठी दीडपट अधिक वाटपाची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे नियमित सात हजार थाळीपेक्षा अधिक म्हणजे ९ ते १० हजार थाळी वितरीत होत आहे.
कोरोनाचे असलेले संकट लक्षात घेता नागरिकांना पुढील जून महिन्यापर्यंत शिवभोजन थाळीचा मोफत लाभ होण्याची शक्यता आहे. याबाबतचे आदेश लवकरच प्राप्त होणार असल्याचे समजते.
--इन्फो--
जिल्ह्यात २३ केंद्रे वाढणार
जिल्ह्यात सध्या ४५ केंद्रे सुरू असून त्यामध्ये आता आणखी २३ केंद्रांची भर पडणार आहे. मंत्रालयाकडून अतिरिक्त केंद्रांसाठीची परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्याला याबाबतचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना केंद्र मान्यता देण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांत ही केंद्रे देखील कार्यान्वित हेाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवभोजन थाळींची संख्यादेखील वाढणार आहे.
===Photopath===
180521\18nsk_40_18052021_13.jpg
===Caption===
शिवभोजन थाळी पार्सल सुविधा