अतिपर्जन्यवृष्टीमुळे शेतीकामास बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी पळसाच्या पानापासून बनविलेल्या उरले, घोंगड्यांचा वापर करतात. देवगांव परिसरात मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प प्रमाणात आहे. गवताच्या झडपी, पडळ बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतात. घरांच्या भिंतीचे पावसापासून संरक्षण व्हावे व घरामध्ये ओलीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जुन्या पारंपरिक पद्धतीने गवताच्या पडवी बांधल्या जातात.
सद्य:स्थितीत बहुतांश जणांनी झडपा बांधून घराच्या भिंतींना संरक्षणात्मक उपाययोजना केली असून काही ठिकाणी झडपा बांधण्याचे कामांचा वेग सुरू आहे. मुसळधार पावसाचा तडाखा ज्या दिशेने बसतो अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना गवताची झडपी बांधली जाते. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस अशा कामांना ग्रामीण भागात जोर येतो. भिंतीपासून दोन्हीबाजूला काही अंतरावर लाकडं उभारून मेसाची फोकाटी आडवी, उभी आता, बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोलंम्ब गवत अशा विशिष्ट पद्धतीने ही झडपी बांधली जाते. पूर्वी छप्परासाठी कौले न वापरता गवताची छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या पावसापासून भिंतींचे संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधतात. पावसाळ्यानंतर कुजलेले गवत खतासाठी वापरले जाते.
इन्फो...
ओलीपासून होणाऱ्या साथींपासून सुटका...
पावसाच्या तडाख्याने भिंतीवरील पाणी या झडपीमुळे जमिनीवर येते. त्यामुळे घराच्या भिंती भिजून घरामध्ये ओल येण्याचा संभव टळतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये तसेच थंडीच्या सुरक्षिततेसाठी गवताची झडपी आवश्यकतेनुसार घरांच्या भिंतींना बांधतात. याकामी शेतकरी गवत राखून ठेवतात.
कोट...
पाऊस सुरू होण्या अगोदर घरांच्या भिंतींचे पावसापासून सरंक्षण होण्यासाठी झडपी बांधतात. पासून मोठ्या प्रमाणावर झाला तरी घराच्या भिंतींना लागत नाही. त्यामुळे भिंती कोरड्या राहून घरातील वातावरण उबदार राहते. प्लास्टिकच्या कागदाला खर्च जास्त असतो तसेच वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे व खूप पावसामुळे प्लास्टिक फाटून जाऊ शकते म्हणून ग्रामीण भागात गवताच्या झडपीला प्राधान्य दिले जाते.
- फुदाबाई सप्रे, देवगांव.
देवगाव येथे भिंतींना झडपी बांधतांना शेतकरी.
===Photopath===
140621\14nsk_24_14062021_13.jpg
===Caption===
देवगाव येथे भिंतींना झडपी बांधतांना शेतकरी.