ठळक मुद्देरुग्णालयाची गरज ओळखून बोडके यांनी ही मदत केली.
घोटी : कोरोनाच्या संकट काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण व आरोग्य यंत्रणेला साहाय्य करणाऱ्या माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये व उपचार प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होऊ नये, म्हणून घोटी ग्रामीण रुग्णालयाला उच्च क्षमतेच्या चार बॅटरी इन्व्हर्टरसह उपलब्ध करून दिल्या आहेत.घोटी ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीवरून व रुग्णालयाची गरज ओळखून बोडके यांनी बुधवारी (दि.२) ही मदत केली. यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सदावर्ते व डॉ.गोरे, बाजार समितीचे प्रशासक मंडळातील नंदलाल भागडे, तुकाराम वारघडे, भोर यांच्यासह टिटोलीचे उपसरपंच अनिल भोपे, राजेंद्र वालतुले, तुषार बोथरा, सचिन तारगे आदी उपस्थित होते.