नाशिक : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असतानाच नाशिकमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे ३० रुग्ण आढळून आल्याने आरेाग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिकमध्ये आढळून आलेला व्हेरिएंट डेल्टा प्लसपेक्षा सौम्य असल्याची दिलासादायक बाब असली तरी या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डेल्टाचा शिरकाव नाशिकमध्ये झाल्याने नागरिकांना मात्र अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.
कोरोना निर्बंधातून काहीसा दिलासा मिळाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टाचा व्हेरिएंट आढळल्याने आरेाग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरेाना पॉझिटिव्ह संशयित १५५ रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले हेाते. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला त्याचा अहवाला प्राप्त झाला असता ३० रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आला. यामध्ये दोन रुग्ण नाशिक शहरातील तर अन्य रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. या अहवालानुसार सिन्नर, निफाड, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये डेल्टाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
नााशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर त्यावर मात करीत जिल्हा सावरत असतानाच डेल्टा व्हेरिएंट आढळून आल्यामुळे आरेाग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने तसेच तत्काळ आरोग्य सुविधा, पुरेशी ऑक्सिजन अशी उपलब्धता असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांना सावधानता बाळगावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडूनदेखील याबाबत नागिकांना आवाहन करण्यात आले आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत असतांना नाशिक जिल्ह्यात मात्र परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला असतांना अचानक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने नाशिकककरांना सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी लागणार आहे. आरेाग्य तसेच जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने याबाबतचे आवाहनदेखील केले आहे.
--इन्फो--
व्हेरिएंट सौम्य; रुग्णांवर लक्ष केंद्रित
इतरत्र आढळणारा डेल्टा प्लसचा व्हेरिएंट हा गंभीर स्वरूपाचा असून सुदैवाने जिल्ह्यात तो आढळून आलेला नाही. आपल्याकडे आढळलेला डेल्टा व्हेरिएंट हा त्या तुलनेत सौम्य आहे. त्यावर वेळीच नियंत्रण आणण्यात आरेाग्य यंत्रणेला यश मिळेल. या रुग्णांवर यंत्रणा लक्ष ठेवून असून नागरिकांनी मात्र काेराेना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.
- ू