कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर शासनाकडून हळूहळू निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली. सध्या उद्याने, जॉगिंग ट्रॅक, जिम, बाजारपेठ सगळे काही पूर्ण क्षमतेने सुरू आहे. यामुळे इंदिरानगर परिसरातील नागरिक सकाळ-संध्याकाळ जॉगिंगसाठी तसेच भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. यामुळे चाेरट्यांच्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. चोरटे पाळत ठेवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करत आहेत. यामुळे महिलांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना सकाळ-संध्याकाळ दागिन्यांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ पोलिसांची गस्त असणे गरजेचे आहे. इंदिरानगर परिसरातील रस्त्यांवर, वर्दळीच्या ठिकाणी सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास पायी, तसेच पोलिसांकडून पॅट्रोलिंग करण्याची मागणी होत आहे.
मॉर्निंग वॉक’ला जाताना सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:15 AM