नाशिक : देशातील श्रद्धास्थान असलेले तुगलकाबाद येथील जगद्गुरू संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचे मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल बहुभाषिक चर्मकार समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिकंदर लोधी यांच्या काळात गुरु दक्षिणा म्हणून सहाशे वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेले हे श्रद्धास्थान उद्ध्वस्त करण्यात आल्यामुळे समस्त बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. शासनाने त्वरित मंदिर पूर्ववत बांधून बहुजन समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.यावेळी चंद्रकांत ठाकरे, दिलीप जाधव, ताराचंद पाथरे, तुकाराम अहिरे, काळू पवार, रमेश पाथरे, भास्कर गाठबांधे, लक्ष्मीबाई अहिरे, सिंधूबाई अहिरे, मालतीबाई अहिरे, निर्मलाबाई अहिरे, भुऱ्याबाई अहिरे, रंजना अहिरे, जिजाबाई अहिरे, गीताबाई अहिरे, म्हाळसाबाई अहिरे, नीलाबाई अहिरे आदींसह संत रविदास अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकल चर्मकार समाजातर्फे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:12 AM