शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

देशात परिवर्तनासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:41 PM

मालेगाव : धर्मांध व जातीयवादी शक्तींना पराभूत करायचे असेल तर कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. जनसंघर्ष यात्रा घेऊन महाराष्टÑाच्या हितासाठी लढाईत उतरलो असून, जनतेने साथ द्यावी. राज्यातील समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजेत, देशात परिवर्तनासाठी सज्ज राहा, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मालेगाव येथे केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : मालेगावी कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे स्वागत

मालेगाव : धर्मांध व जातीयवादी शक्तींना पराभूत करायचे असेल तर कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. जनसंघर्ष यात्रा घेऊन महाराष्टÑाच्या हितासाठी लढाईत उतरलो असून, जनतेने साथ द्यावी. राज्यातील समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजेत, देशात परिवर्तनासाठी सज्ज राहा, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मालेगाव येथे केले.मालेगावी कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आगमन झाले. त्यानंतर तालुका कॉँग्रेस कमिटीच्या आवारात घेण्यात आलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार हुसेन दलवाई, आमदार निर्मला गावित, सुधीर तांबे, आसिफ शेख, माजी मंत्री शोभा बच्छाव, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, राजू वाघमारे, शांताराम लाठर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, सचिन सावंत, हेमलता पाटील, किशोर पाटील, प्रांतिक सदस्य प्रसाद हिरे, अरुण देवरे, केवळ हिरे, एस. एस. देवरे आदी उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या दर्शनालाही जाता येत नाही ही शोकांतिका आहे. कॉँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले होते. कोणताही अर्ज आॅनलाइन स्वीकारला जात नाही. त्यांना सरकार चालविता येत नाही असा आरोप करून सध्या देशात गरीबांची थट्टा सुरू झाली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे, एकमताने उमेदवार देऊ, असे आवाहन त्यांनी केले.कॉँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. मालेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती असून, खरीप पीक हातचे गेले आहे. विहिरी आटल्या असून, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शेवाळे यांनी केली. आमदार आसिफ शेख म्हणाले, साडेचार वर्षांत २ लाख तरुणांना नोकरी देऊ शकले नाही. जनता आश्वासनांचा हिशेब मागत असताना हिंदू-मुस्लिमांना लढविण्याचे काम सरकार करीत आहे, असेही ते म्हणाले.आमदार सुधीर तांबे, निर्मला गाविता, प्रसाद हिरे यांचीही भाषणे झाली. जिल्हा महिला कॉँग्रेस सरचिटणीस मंगला तलवारे व तालुका महिला कॉँग्रेस अध्यक्ष संगीता बच्छाव यांचा सात हजार आदिवासींचे दाखले बनविल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात दोन जणांना जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी आभार मानले.समाजातील एकही घटक सरकारवर समाधानी नाही, प्रत्येक घटक पीडित झाला आहे. अर्थव्यवस्थेवरचे मोदी सरकारचे नियंत्रण सुटले आहे. रुपया स्वस्त होत आहे. कॉँग्रेसच्या काळात सरकारवर २ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज होते ते फडणवीस सरकारने ५ लाख कोटींवर नेऊन ठेवले आहे. इंधन दरवाढ हा सरकारने लावलेला जिझिया कर आहे. राज्यात १६ हजार शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकºयांचा सातबारा कोरा करावा म्हणून आम्ही मागणी केली. पाण्यापेक्षा दुसरी गंभीर समस्या राज्यात नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, देशोधडीला लागला आहे. नियोजन न करता जीएसटी घाईगर्दीत आणले. नोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा करण्याची योजना मोदी सरकारने आणली. मोदी मित्रांचा काळा पैसा पांढरा झाला. आज तरुणांना नोकºया नाहीत, सरकारची कर्ज काढण्याची ऐपत राहिली नाही. इंजिनिअरिंगच्या १ लाख ६० हजार जागा रिक्त आहेत. मोदींनी लोकांचा विश्वासघात केला आहे. मोदी पुन्हा चुकून निवडून आले तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्रीसरकारची स्थिती अशी...सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारची स्थिती कशी आहे हे स्पष्ट करण्यासाठी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी एक गोष्ट सांगितली. एका शाळेत एक विद्यार्थी टेबलवर उभे राहून लघुशंका करीत होता. त्याची तक्रार करण्यासाठी त्याचे वर्गशिक्षक त्याला त्याच्या वडिलांकडे घेऊन गेले. त्यावेळी त्याच्या वडिलांनी मी तर छतावर उभे राहून लघुशंका करतो, असे वर्गशिक्षकांना सांगितले. यामधून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. यामुळे उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.