शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेली आहे. मनोरुग्णांसाठी लागणाऱ्या गोळ्या व औषधांचा सर्रासपणे नशेसाठी वापर केला जात आहे. नशा केलेल्यांकडून गुन्हा केला जात आहे. संगमेश्वरातील तरुणावर प्राणघातक हल्ला केला गेला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दुचाकी चोरणे, रस्ता लूट, महिलांची छेड काढणे, मोबाईल हिसकावणे, कटरने वार करणे असे गैरप्रकार वाढले आहेत. पोलीस प्रशासनाने कुत्ता गोळी व मादक पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी. मालेगावी पूर्ण वेळ अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याची नेमणूक करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, प्रमोद अभोणकर, कैलास शर्मा, कैलास तिसगे, सतीष कलंत्री, अमित बिरारी, जयेश गिते, सनी वडनेरे, विवेक वारूळे, किशोर चौधरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो फाईल नेम : २१ एमजेयुएन ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी नशेच्या गोळ्या व औषधे विक्रीवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना देताना सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, कैलास तिसगे, कैलास शर्मा, प्रमोद अभोणकर, भालचंद्र खैरनार आदिंसह पदाधिकारी.
फोटो फाईल नेम : २१ एमजेयुएन ०४ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी नशेच्या गोळ्या व औषधे विक्रीवर बंदी घालावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करताना सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे पदाधिकारी.
===Photopath===
210621\21nsk_40_21062021_13.jpg~210621\21nsk_41_21062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.