नाशिक : मोबाइल फोन दिला नाही या कारणावरून कुरापत काढून तिघांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टाकळी परिसररात राहणाऱ्यांना उर्फ राजेश भास्कर शार्दुल यांनी तक्र ार दिली आहे.शार्दुल यांनी दिलेल्या तक्र ारीवरून फुलेनगर येथे राहणाºया राजेश बत्तीशे उर्फ पवार व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. बाजार समितीत असलेल्या एकवीरा ट्रान्सपोर्टसमोर शार्दुल उभे असताना संशयित पवार त्याठिकाणी आला व त्याने शार्दुल याच्याकडे मोबाइल मागितला मात्र शार्दुलने मोबाइल देण्यास टाळाटाळ केल्याने संशयितांनी शिवीगाळ व मारहाण केली.पूर्ववैमनस्यातून घरावर दगडफेकनाशिक : पेठरोडवरील ओंकारनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून सात ते आठ संशयितांनी घरावर दगडफेक करत चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुक्र वारीसायंकाळी साडेपाच वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.याबाबत ललित सोमनाथ खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरज चारोस्कर, नानू (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), मुन्ना गांगुर्डे, धुवारे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्यांच्या अन्य तीन ते चार साथीदारांनी चाणक्यपुरी सोसायटीच्या समोर अडवून आमच्या बद्दल आकाशला काय सांगितले.या कारणावरून कुरापत काढून दगड फेकून मारहाण केली. त्यानंतर रात्री पुन्हा संशयित खैरनार याच्या घरी आले व त्यांनी शिवीगाळ केली आणि दगडफेक केली त्यात खैरनार याच्या बहिणीच्या ओठाला लागले म्हणून सिद्धांत शिंदे हा वाद मिटविण्यासाठी आला असता संशयितांनी सिद्धांत याच्या घरी जाऊन दगडफेक केली.दुचाकीची धडक; दोन जखमीमालेगाव : तालुक्यातील सवंदगाव- मालेगाव रस्त्यावर दोन दुचाकींची धडक होऊन साजीद अहमद शकील अहमद व अब्दुल खलील जैतुनअबदीन जखमी झाले.साजीद अहमद रा. इस्लामाबाद पाण्याच्या टाकीजवळ याने पवारवाडी पोलीसात फिर्याद दिली. पोलीसांनी दुचाकी चालकाविरोधात (क्र. एम.एच.४१. ए.सी.१०१२) गुन्हा दाखल केला. सदर दुचाकी चालक याने दुचाकी (क्र. एम.एच.४१. ए.सी.३९६७) ला पाठीमागुन धडक दिली.
मोबाइल न दिल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 2:16 AM