लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : बाळावर व्यवस्थित उपचार केला नसल्याचा राग आल्याने तालुक्यातील बोलठाण येथील बालरोगतज्ज्ञाला एकाने मारहाण केली. घटनेचा निषेध म्हणून तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशनने अत्यावश्यक सेवा वगळता बंद पळून आपला निषेध व्यक्त केला.दरम्यान पोलिसांनी डॉ. देवेंद्र आहेर यांना मारहाण करणाऱ्या विजय नामदेव पवार यांच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक सुरवडकर तपास करीत आहेत. बोलठाण येथील डॉ. देवेंद्र आहेर यांच्यांकडे विजय पवार यांनी आपल्या लहान मुलाला वैद्यकीय उपचारासाठी नेले, मात्र तुम्ही माझ्या बाळावर व्यवस्थित उपचार केले नाहीत, अशी कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. घटना कळताच तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दोषींवर कारवाई करावी यासाठी निवेदन दिले. यावेळी डॉ. शांतिलाल पारख, गादिया, सुनील तुसे, दुकळे, नावंदर, भरत जाधव आदी डॉक्टर्स उपस्थित होते.बोलठाण येथे बालरोगतज्ज्ञ डॉ. देवेंद्र आहेर यांच्यावर क्षुल्लक कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकाने हल्ला केला, या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि समाजातील अशा विकृत मानसिकतेला कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष महेश सोनवणे-पाटील, महावीर सुराणा, शरद आहेर, सागर गोयेकर, सतीश जाधव, संजय लोहाडे, सुनील दुगड, आशुतोष गुंजाळ, चंद्रशेखर चव्हाण, गणेश शिंदे, नीरज सुराणा, विकी गायकवाड, पोपट खैरे, शेख सबीक दस्तगीर आदी यावेळी उपस्थितहोते.वैद्यकीय सेवा काही वेळ बंद घटनेचा निषेध म्हणून डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा काही काळ बंद ठेवली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शहरातील मेडिकल्स ड्रग्ज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले.
बालरोगतज्ज्ञाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:37 PM
नांदगाव : बाळावर व्यवस्थित उपचार केला नसल्याचा राग आल्याने तालुक्यातील बोलठाण येथील बालरोगतज्ज्ञाला एकाने मारहाण केली. घटनेचा निषेध म्हणून तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशनने अत्यावश्यक सेवा वगळता बंद पळून आपला निषेध व्यक्त केला.
ठळक मुद्देनांदगाव : वैद्यकीय व्यावसायिकांतर्फे निवेदन