तालुक्यातील एकूण चार गावे स्पर्धेत होती. त्यात अंबोली गावाला सर्वाधिक गुण मिळाल्याने ते तालुक्यातील सर्वात सुंदर गाव ठरले. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनस्तरावरून दिला जाणारा आहे. तालुक्यातून १७ गावे या पुरस्काराकरिता सहभागी झाले होते. त्यापैकी चार गावे शर्यतीत होती. अंबोली गावाची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली.या चार गावांमध्ये अंबोली, पिंप्री त्र्यं., हातलोंढी व बेझे या चार गावांना ग्रा.पं. व तालुका समितीतर्फे गुण देण्यात आले. यासाठी सरपंच चंद्रभागा पांडुरंग लचके, उपसरपंच लंकाबाई लक्ष्मण मेढेपाटील, ग्रामसेवक जितेंद्र भाईदास नांद्रेपाटील, गोकुळ मेढे, अनिल भोई, तानाजी कड, काळूबाबा लचके, काळूबाई ताठे, राधाताई गुंबाडे, ज्योतीताई लचके, ग्रा.पं. कर्मचारी त्र्यंबक मेंगाळ सूर्यकांत मेढे आदींनी मेहनत घेतली.सौरऊर्जा, बायोगॅस संयंत्राचा वापरगावाच्या तपासणीसाठी पाच अधिकाऱ्यांचा सहभाग होता. समितीतर्फे वैयक्तिक शौचालय व वापर सार्व. शौचालय वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आरोग्य शिक्षणविषयक सुविधा केंद्र व राज्य पुरस्कृत योजना, बचतगट प्लॅस्टिक वापरबंदी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, मागासवर्गीय व महिला बाल कल्याण, एलईडी दिवे वापर, विद्युत पथदीप व सौरऊर्जा पथदीप बायोगॅस संयंत्राचा वापर, वृक्षलागव,ड जलसंधारण, ग्रामपंचायत एवम अभिलेख आदी बाबींची तपासणी करून हे गुण दिले दिले. अंबोली गाव कसोटीला उतरले आहे.
अंबोली गावाला सुंदर गाव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 9:30 PM