जळगाव नेऊर : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना वाढती मागणी लक्षात घेता बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आणली; परंतु भाव न मिळाल्याने शेतकºयांना रस्त्यावर झेंडूची फुले टाकून देण्याची वेळ आली. चार पैसे मिळविण्यासाठी शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवून कोणत्या सिझनमध्ये कोणत्या पिकाला भाव राहिली त्या पद्धतीने पीक घेत असतो. शेतकºयांनी यंदा दसरा-दिवाळीच्या भरवशावर मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली. पावसाळ्यात साठवलेल्या पाण्यावर झेंडुची शेती केली; परंतु हीच झेंडूची फुले रस्त्यावर टाकून देण्याची वेळ बळीराजावर ओढवली. विजयादशमीनिमित्त झेंडूची फुले मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आणण्यात आली. सकाळी चाळीस ते पन्नास रुपये किलोचा भाव मिळाला; परंतु बाजारासह रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दुकाने जास्त आणि ग्राहक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी पाच ते दहा रु पये किलोने विकण्यापेक्षा, तसेच यातून खर्चही वसूल होत नसल्याने अनेक शेतकºयांनी झेंडूची फुले महामार्गावर फेकून दिली.
भाव नसल्याने झेंडू फेकले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 1:49 AM