नांदगाव : आंतर जिल्हाबंदी आदेश मोडून नांदगाव तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करू द्यावा म्हणून आग्रह धरणारे व पोलिसांवर हल्ला करणार्या चाळीसगाव तालुक्यातील सायगावच्या हल्लेखोरांपैकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने या प्रकरणाची चौकशी करणारे नांदगावचे पोलीस कोरोनाच्या दहशतीखाली आले आहेत.दरम्यान, कोरोना पाजिटिव्ह असलेल्या रु ग्णाला सुविधा असलेल्या इिस्पतळात ठेवण्याऐवजी विलगीकरणासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आश्रमशाळेच्या इमारतीत ठेवण्यात आल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या ढिसाळपणावर आक्षेप घेतला आहे. त्या युवकाचा अहवाल पॉझीटीव्ह येताच नांदगाव पोलीस स्टेशन व आजूबाजूचा भाग तातडीने निर्जंतुक करण्यात आला. नगर परिषदेच्या कर्मचार्यानी निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली. नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर आमोदे या चेक पोस्टवर सदर प्रकार घडला होता. चौकशी न करता आमच्या गावची वाहने सोडून देत जा. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील असा दम देत 15 ते 20 जणांनी कर्तव्य बजावत असलेल्या दोघा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी करण्याची घटना 11 मे रोजी घडली होती. पुढील कारवाईत पोलिसांनी सायगाव येथून चार जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रि या पूर्ण करतांना अटक केलेल्या चौघांचे स्वब पाठविण्यात आले असता तिघांचे निगेटिव्ह आले. पण एकाचा कोरोना चाचणी अहवाल पोझीटीव्ह आला. यामुळे नांदगाव पोलिसांसह, सायगाव येथील ग्रामस्थांचे धाबे दणाणले. दरम्यान, सायगाव येथील धोका पातळीवर असलेल्यांचे स्वब तपासणीसाठी पाठविले आहेत.------------------------------यापूर्वी आमोदे गावात कोरोनाचा रु ग्ण सापडला होता व आता त्याच गावच्या हद्दीवर सायगावकडून येणारी व्यक्ती कोरोना पोझीटीव्ह सापडल्याने ग्रामीण भागातील कोरोनाच्या छुप्या घुसखोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आमोदे, बोराळे या नांदगाव तालुक्यातील गावात लोकांनी सावधान रहावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी केले आहे.
त्या रु ग्णामुळे पोलिसांना कोरोनाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 9:19 PM